There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
5वी ते 7वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी
Sun Aug 17, 2025
मी गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. एक गोष्ट अनुभवाने सांगू शकतो की, 5वी ते 7वीत शिकणारे, विशेषतः त्यातील 50ते 60% विद्यार्थी ही हिऱ्याची खाण आहे. देशाची अनमोल संपत्ती आहे.
खालील दोन मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट होईल -
📣 1. या वयोगटातील 50 ते 60 % विद्यार्थी स्वतःच्या वेगाने शिकू शकतात.
इयत्ता 5वी ते 7वीच्या प्रत्येक वर्गात 50 ते 60 % विद्यार्थी असे असतात की, त्यांची Grasping Power उत्तम असते. ते शिक्षकांची कमीतकमी मदत घेऊन स्वतःच्या वेगाने शिकणारे असतात.
आपण मात्र त्यांच्यावर वयाची विनाकारण बंधने घालतो.
तू 8वी - 9वीत गेल्यावर एखाद्या विषयाचा पुढील Topic शिक. आता, तो Topic तुझ्या अभ्यासक्रमात नाही.
उदाहरणार्थ -
गणितातील समीकरणासारखा (Equations) महत्वपूर्ण Topic 9वी - 10वीत गेल्यावरच शिकावा. अशा बंधनांची या 50 ते 60 % विद्यार्थ्यांना गरज नसते. कारण ते योग्य मार्गदर्शनाने समीकरणासारखे अनेक Topics शिकू शकतात.
सारांश -
त्याची Grasping Power (आकलन शक्ती), Capacity (क्षमता) आपण पूर्णपणे उपयोगात आणण्यास कमी पडतो एवढे मात्र खरे !
📣 2. विद्यार्थी भविष्यात कोणत्या क्षेत्रात चमक दाखवेल यांचा वेध घेण्याचा हाच सुयोग्य कालावधी
पूर्वी मला वाटायचे की, 9वी - 10वी अगदीच झाले तर 11वी - 12वी हा कालावधी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या Career निश्चितीसाठी योग्य आहे.
पण ते तितकेसे खरे नाही.
5वी ते 7वीतच विद्यार्थ्याचा कल कळाल्यास त्याला Groom करणे सोपे होते. अनेक अनावश्यक गोष्टी टाळता येतात. आपल्या Career वर जास्तीजास्त एकाग्र होता येते.
कारण, प्रत्येकाची 8वी - 10वी वेगवेगळी असते. याविषयी आपण अगोदरच्या लेखात बोलेलोच आहे. तुम्हाला खेळात Career करायचे असल्यास 8वी - 10वी सर्वच विषय इतके खोलात शिकण्याची गरज नसते. प्रत्येक Career नुसार कोणता विषय किती खोलात शिकायचा याचे नियोजन करता येते.
नवीन शैक्षणिक धोरण 2022 यासाठी जास्तीजास्त सुसंगत वाटते आहे.
थोडक्यात,
5वी ते 7वीतील '50-60%' मधील Talent अचूक हेरणे हे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्याकडे 'या Category' मधील कोणी असेल तर तुमच्याकडे हिरा आहे हे लक्षात असुद्या. त्या हिऱ्याला पैलू पाडण्याची हीच ती वेळ !
‘शामल’ सारखा Spark तुमच्या मुलामध्ये आहे का?
🌟 इयत्तेच्या चौकटीत मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांना Topic-wise शिकण्याची संधी दिल्यास ते त्यांची खरी क्षमता आणि प्रतिभा अधिक उजळून दाखवू शकतात.
👇 फक्त खालील बटणावर क्लिक करून “I have The Diamond” असा मेसेज करा.
(Write your Name & Place in the message.)